Friday 13 December 2013

माझ्या कविता


आई



आई महणजे माया
आई म्हणजे जीवनाचा पाया
स्वताच्या मुलांकरता
जन्मभर राबते तिजी काया

आई म्हणजे नेतृत्व
आई म्हणजे कर्तुत्व
प्रत्येकाच्या जीवनात
आईला अनन्य साधारण महत्व

आई म्हणजे अखेरचा श्वास
आई म्हणजे ऐक व्यक्तीच खास
प्रत्येकाच्या हृदयात असतो
कायम हीजा वास

आई म्हणजे दैवी देण
जिचे प्रत्येक जन लागतो काहीतरी देण
जिच्याशिवाय प्रत्येकालाच
मुश्किल होत जीण

आई म्हणजे पहिला गुरु
जीथूनच होतात संस्कार सुरु

 ***श्रीकांत जाधव सातारा***



 प्रेम म्हणजे...




 प्रेम म्हणजे त्याग
प्रेम म्हणजे अतूट विश्वास
प्रेम म्हणजे जगण्याचा ध्यास
प्रेम म्हणजे जीवनाचा श्वास

प्रेम म्हणजे सळसळता वारा
प्रेम म्हणजे अश्रूच्या धारा
प्रेम म्हणजे जुळलेल्या
दोन हृदयाच्या तारा

प्रेम म्हणजे अतूट नात
ते फक्त विश्वासावरच उभ राहत
असेल जर दोघांची साथ
तरच ते टिकून राहत

प्रेम म्हणजे सतत कुणाच्या तरी
आठवणीत जगण
विषय कोणते पण असू
पण आपण फक्त तिच्याच विचारात मग्न

प्रेम म्हणजे असतो
एक बेभरवशी खेळ
बसला चुकून जर मेळ
नाहीतर फक्त वय जातो वेळ

***श्रीकांत जाधव सातारा***मन ....

एक रे माझ्या मना
तुजे पळणे आता तरी थांबव ना
नाही रे कळत सगळ्या मला
तुज्या या खाणाखुणा

नको आठवू परत
तू तोच दिवस जुना
सोडून दे मी पणा
तरच नेहमी मिळेल
तुला प्रसन्न पणा

एक रे माझ्या  मना
समजून घे तू सगळ्यांच्या भावना
जीवन आहे एकदाच
नाही रे पुन्हा पुन्हा !!

***श्रीकांत जाधव सातारा***



राज ठाकरे ...

खरोखर मला राज ठाकरे याचं अगदी मनापासून पटत
कारण त्यांनाच फक्त महाराष्ट्राच भाल वाटत
बाकीचे पक्ष म्हणजे फक्त योजना आणि घोटाळे
त्यांनीच तर केले या देशाचे वाटोळे

खरच राज ठाकरे यांच्या हाती
एकदा जायला हवी सत्ता
तरच आपला देश होईल
एकदा तरी महासत्ता

राज ठाकरेंचा यु पी बिहारी हटावो मुद्दा
आहे अगदी खरा
त्यांच्यामुळेच मराठी माणूस
कुजतोय खरा

राज ठाकरेंनी मराठी माणसासाठी
केल पाहिजे काहीतरी छान
हाकलून परप्रांतीयांना
महाराष्ट्राची काडून टाकली पाहिजे घाण !!!!!!

***श्रीकांत जाधव सातारा***

प्रेम ...


काय असतंय प्रेम
आणि त्याची कहाणी
नसला हातात हात
तरी डोळ्यात नक्की पाणी

असते त्या दोघांची
एक वेगळीच कहाणी
तिचा तो राजा
आणि त्याची ती राणी

दोघेही गात असतात
फक्त प्रेमाचीच गाणी
कधी असत निखळ हास्य
तर कधी डोळ्यात पाणी

*** श्रीकांत जाधव सातारा  ***





No comments:

Post a Comment