Wednesday 15 January 2014

प्रेमात पडलेल्या प्रत्येकासाठी प्रेमावर बोलू काही ! !


     

     काल परवाच  टायमपास हा सिनेमा बगीतला आणि प्रेमावर त्यान काहीतरी लिहायला भाग पाडलच   आणि थोड अगोदरच  लिहून ठेवलं होत खरच प्रेम हि एक सुंदर भावना आहे ती फक्त जगुनच कळू शकते यामध्ये कुणाचे अनुभव ऎकुन उपयोग नाही जर प्रेम भावना अनुभवायची असेल तर त्याला प्रेमातच पडाव लागत प्रेम हे सांगून कधी होत नाही  तुमी सगळ्यांनी कधी तरी किशोर कुमार याचं  कटी पतंग मधील गाण ऎकल असेल
प्यार दिवाना होता हे मस्ताना होता है
हर ख़ुशी से हर गम से बेगाना होता है
या गाण्यातील दुसर्या कडव्या तील एक ओळ म्हणजे
आ हि जाता हे जिसपे दिल आणा होता हे
             त्याप्रमाणेच जेव्हा एकादी व्यक्ती आवडायचे ना तेव्हा ती आवडणारच ते म्हणजे प्रेम ते हृदयातून सुरु होत आणि आपण त्या व्यक्तीला स्वतापेक्षाहि जास्त जपायला लागतो ते म्हणजेच प्रेम ते सांगून होत नाही त्या सगळ्या भावना हृदयातूनच उमटू लागतात आणि आपण हळू हळू वाहत जातो हे कळतच नाहीआणि हृदयातच संपत भले ती व्यक्ती आपल्याला भेटू किंवा न भेटू त्या व्यक्तीची जी जागा निर्माण झालेली असते ना हृदयात ती काडून नाही टाकता येत किंवा त्या व्यक्ती बद्दल निर्माण झालेले प्रेम कमी नाही  करता येत  कारण आपल्या हृदयाला कॉम्पुटर सारखे रिसायकल बिन नाही ना आणि असत तर आपण कधी दुखीच झालो नसतो सगळे वाईट क्षण डिलीट केले असत आणि नेहमी आनंदात राहिलो असतो ना !
खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे !!!
                                                    साने गुरुजी !!
धर्म आपल्याला जन्माने मिळतो
पण प्रेम आपल्याला कर्माने मिळते
मग प्रेमालाच आपण आपला धर्म बनवला तर..
आयुष्यात प्रेम मिळवायचं तर
आयुष्यावर प्रेम करता आल पाहिजे
आयुष्यातील प्रत्येक गोष्टीवर प्रेम करता आल पाहिजे.
विश्वास असा द्या कि प्रेम सर्व शक्तिमान आहे
तुमच्या ह्रदयात प्रेम आहे ना ?......... मग तुम्ही सर्व शक्तिमान आहात.
तुम्ही निस्वार्थी आहात ना ? मग तुम्हाला कोणीही पराजित करू शकणार नाही
चारित्र्याचाच सर्व ठिकाणी विजय होतो आपण जर स्वतावर जर प्रेम करायला शिकलो तरच
आपण दुसर्यावर प्रेम करू शकतो जो स्वतावर प्रेम करू शकत नाही तो दुसर्यावर काय प्रेम करणार .
गुलजार यांनी म्हटलयच
ए इश्क नाही आसन
बस इतना समज लिजिये
एक आग का दरिया है
और सिर्फ डूब के हि जाना है
           प्रेमाच्या या प्रवासात खूप सारी माणस भेटतात  काही आपुलकीन वागणारी,तर काही स्वताला धोक्यात घालून मदत करणारी तर काही पाय काडून घेणारी हे तस स्वाभाविकच आहे कारण पु लं देशपांडे नि म्हटलयच कि व्यक्ती तितक्या प्रवृत्ति मग निरनिराळ्या स्वभावाची माणस भेटणारच त्यात अनपेक्षित आस काही नाही पण जो शेवट पर्यंत लढतो तोच जिंकतो दुनियादारी मधला एक डायलॉग आठवतो कि जेव्हा खर प्रेम मिळवायची वेळ येते ना तेव्हाच खर धडपड,प्रयत्न करणे गरजेचे आहे त्यावेळी जो लडतो तो जिंकतो आणि तरीपण नाहीच जिंकला तरी हार मानून उपयोग नाही कारण देव जेव्हा आपली ओंजळ रिकामी करतो तेव्हा आपल्याला काहीतरी भरभरून देण्यासाठी हे लक्षात ठेवावे आपण जेव्हा मनापासून एकाद्यावर प्रेम करतो त्याला आपण आपले सर्वस्व अर्पण करतो तरी पण ती व्यक्ती आपल्याला नाही भेटली तर निराश होऊ नका कारण प्रेम म्हणजे प्रेम आहे आपण एकाद्यावर अतोनात प्रेम करतो आणि त्यान पण आपल्यावर तितकच प्रेम कराव आस आपण म्हणू शकत नाही कारण हा व्यवहार नाही हे प्रेम आहे आणि एकादी व्यक्ती आपण इतक मनापासून प्रेम करून जर आपली नाय होऊ शकली तर ती दुसर्याची काय होणार आहे एवड्च लक्षात ठेवावे.
        प्रेम प्रेम प्रेम फक्त प्रेम या शब्दातच खरी काय तरी जादू आहे आपलेपनाची,माणुसकीची आणि माणसे जोडण्याची  आणि माणसे तोडण्याची सुद्धा प्रेम या विषयावर खूप सारी पुस्तक लिहली गेलीत प्रत्येक लेखकांनी त्याची वेगवेगळी व्याख्या केली आहे या जगात प्रेमाला कितीही विरोध झाला तरी प्रेम नष्ट होऊच  शकत नाही  कारण सडक सिनेमा १९९१ साली आला त्यामधील एक गाण आहे
प्यार करणे वालो को ये दुनिया जब तडपायेगी
मोहब्बत बडती जायेगी मोहब्बत बडती जायेगी 
                   इतक सुंदर गाण त्यावेळी लिहल गेलंय म्हणजे प्रेमाला पूर्वीपासूनच विरोध आहे तरी पण प्रेम प्रकरण व्हायाची राहिलीत का ?आणि होतच राहणार त्याला समाजातून किती पण विरोध होऊद्या या प्रेमाला जगातून कोण संपउ शकत नाही प्रेम म्हणजे काय असत याच एक छान उदाहरण व पु च्या एका पुस्तकात दिले आहे एक प्रेम करणारे जोडपे असते मग तिचा वाढदिवस असतो म्हणून त्याला ती त्याला आमंत्रण देते व त्याला तिच्या वर त्याच प्रेम आहे का नाही हे बग्ण्यासाठी ती म्हणते मी तुजी परीक्षा घेणार आहे तू वाढदिवसाला घरी ये   मग वद्दिवसदिवशि तो घरी मस्त पेकी त्याला गिफ्ट घेऊन येतो आणि तिचे दार वाजवतो ती आतून आवाज येतो  कोण आहे तो म्हणतो कि मी आहे. त्यावर ती उत्तर देते कि आता पुढच्या वाढदिवसाला ये पुढच्या वाढदिवसाची वाट बगत बसतो मग तो दिवस येतो परत तो घरी गिफ्ट घेऊन जातो परत दार वाजवतो परत आतून आवाज येतो  कोण आहे तो म्हणतो कि मी आहे. त्यावर ती उत्तर देते कि आता पुढच्या वाढदिवसाला ये परत पुढच्या वाढदिवसाची वाट बगत बसतो मग तो दिवस येतो परत तो घरी गिफ्ट घेऊन जातो परत दार वाजवतो परत आतूनआवाज येतो  कोण आहे तो म्हणतो कि आता तूच आहेस मी उरलोयचं कुठ आता तेव्हा ती दार उगडते म्हणजे सांगायचं तात्पर्य कि प्रेमात मी उरतच नाही आणि जर मी उरलाच तर ते कदाचित प्रेम नसेल प्रेम करायचेय न निस्वार्थी मग त्याला स्वताला झोकून,स्वताला विसरून प्रेम करायचे असते .
                जेव्हा माणसाला प्रेम होत न त्यावेळी त्याला सगळ जगच जणू सुंदर वाटायला लागत प्रत्येक गोष्ट सुंदर वाटायला लागते आपल प्रेम म्हणजे सर्वस्व सत्य आहे बाकी कोणत्याच गोष्टीत लक्ष लागत नाही जणू  काही ती एकच गोष्ट आपले जीवन होऊन जाते चोवीस तास आपण एकाच गोष्टीत वाहून गेलेलो असतो फक्त मग आपल्याला प्रेमाविषयचं बोलाव वाटत बाकी सगळ जग आहे का नाही याचा विसरच पडतो.मग पूर्ण दिवस त्याच व्यक्तीची आठवण काडत बसण किंवा त्या व्यक्तीबर घालवले सुंदर क्षण आठवत बसण हेच आपल काम होऊन बसत परत त्या व्यक्तीला कधी भेटायचं काय बोलायचं याचाच मन विचार करत बसत.
 प्रेम म्हणजे टायमपास नसतो तर प्रेम म्हणजे जे काय थोडे दिवस एक्मेकाबर घालवले आहेत ते जीवनातले सगळ्यात सुंदर क्षण असतात.

या जगात ताकतीची गरज तेव्हाच लागते
जेव्हा काहीतरी वाईट करायचे आहे
नाहीतर जीवनात सर्व काही मिळवण्यासाठी
फक्त प्रेमच पुरेसे आहे !


प्रेमावर केलेली माजी छोटीशी कविता
 प्रेम म्हणजे
प्रेम म्हणजे त्याग
प्रेम म्हणजे अतूट विश्वास
प्रेम म्हणजे जगण्याचा ध्यास
प्रेम म्हणजे जीवनाचा श्वास

प्रेम म्हणजे सळसळता वारा
प्रेम म्हणजे अश्रूच्या धारा
प्रेम म्हणजे जुळलेल्या
दोन हृदयाच्या तारा

प्रेम म्हणजे अतूट नात
ते फक्त विश्वासावरच उभ राहत
असेल जर दोघांची साथ
तरच ते टिकून राहत

प्रेम म्हणजे सतत कुणाच्या तरी
आठवणीत जगण
विषय कोणते पण असू
पण आपण फक्त तिच्याच विचारात मग्न

प्रेम म्हणजे असतो
एक बेभरवशी खेळ
बसला चुकून जर मेळ
नाहीतर फक्त वय जातो वेळ

***श्रीकांत जाधव सातारा***




No comments:

Post a Comment