Monday 5 August 2019

सुपर 30

आज सुपर 30 पहिला
आणि खरंच मन सुन्न झालं
काही तरी निस्वार्थी करण्यासाठी
मनात अजून बळ आलं

काही काही माणसं
किती असतात निस्वार्थी
मनात नसतो काहीच
किंचितसा लवलेश पण स्वार्थी

स्वतःसाठी सगळेच जगतात
आपण काहीतरी वेगळं करूया
आपल्या आनंदाबरोबर
इतरांच्या जीवनात ही आनंद भरूया

अशा माणसांचा आदर्श
प्रत्येकाना घ्यायलाच हवा
दुसऱ्याला मदत करायला
प्रत्येकाने थोडा वेळ द्यावा

@श्रीकांत जाधव २८ जुलै २०१९








No comments:

Post a Comment